Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझ्यासोबत ५० आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले!

गुवाहाटीः शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे  हे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून आज गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाततच्या पुढील रणनिती आखण्यात येतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना शिंदे यांनी ही दावा केला आहे.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे देखील गुवाहाटीला पोहोचले असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, अद्याप भास्कर जाधव यांच्याशी संपर्क झाला नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच, सध्या आम्हाला ५० आमदारांचा पाठिंबा असून त्यात ४०पेक्षा अधिक आमदार शिवसेनेचे आहेत. तर, इतर अपक्ष आमदार आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज आमची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. राज्यपालांना पत्र द्यायचं की नाही याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आमच्याकडे जवळपास ५० आमदार आहेत. जी काही मॅजिक फिगर लागते त्यापेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळं पुढील रणनिती ठरवण्यासाठी आज बैठक होणार आहे. राज्यपालांना पत्र पाठवण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button