Uncategorizedक्रिडाताज्या घडामोडी
सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० साठी मुंबईच्या संघात अर्जुनचा समावेश
![Arjun Tendulkar selected for Sayyad Mushtaq Ali T20](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Arjun-Tendulkar-selected-for-Sayyad-Mushtaq-Ali-T20.jpg)
युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची आगामी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे. २१ वर्षीय अर्जुनला प्रथमच मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान देण्यात आले आहे. अर्जुनसह कृतिक हणंगवाडीलाही मुंबईने संघात स्थान दिले आहे.
मुंबई निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला यांनी यासंबंधी अधिकृत माहिती दिली. ‘‘मुश्ताक अली स्पर्धेसाठी सुरुवातीला आम्ही मुंबईचा २० जणांचा चमू जाहीर केला होता. परंतु करोनाच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी म्हणून २२ खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय असल्याने अर्जुन तेंडुलकर आणि कृतिक हणंगवाडी यांचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे,’’ असे अंकोला म्हणाले. यापूर्वी अर्जुनने मुंबईच्या विविध वयोगटाताली संघांचे प्रतिनिधित्व केले असून भारतीय संघासाठी त्याने नेटमध्येही गोलंदाजी केली आहे.