शिवच्या होत्या तब्बल एवढ्या गर्लफ्रेंड्स, वीणासमोरच केला खुलासा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/shiv-thakre-and-veena-jagtap-2.jpg)
काही दिवासांपूर्वी कलर्स वाहिनीवरील अभिनेता जितेंद्र जोशीचा ‘दोन स्पेशल’ हा शो चर्चेत होता. सोशल मीडियावर होणाऱ्या आरेरावी आणि एकेरी उल्लेखाबाबत प्रश्न उभा करत जितेंद्रने शोमध्ये चीड व्यक्त केली होती. या शोमध्ये अनेक कलाकार हजेरी लावतात. या शोमध्ये अभिनयाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून कलाकारांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांची मते, त्यांचे विचार गप्पांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न जितेंद्र करत असतो.तसेच कलाकारांच्या आयुष्यातील गुपितं देखील सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न जितेंद्र करतो.
नुकताच ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात ‘बिग बॉस २’च्या स्पर्धकांनी हजेरी लावली. दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सर्वांचे लाडके कपल शिव ठाकरे आणि वीणा जगतापने. जितेंद्रशी गप्पा मारताना शिवने त्याच्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. वीणासोबत अफेअर होण्याआधी तुझे कोणासोबत अफेअर होता का? असा प्रश्न जितेंद्रने शिवला विचारला. त्यावर शिवने ‘एक’ हे उत्तर देताच नेहाने ‘हे साफ खोट आहे’ असे म्हटले. त्यानंतर लगेच शिव ‘हो म्हणजे खूप साऱ्या गर्लफ्रेंड होत्या’ असे म्हणतो. त्याचे हे उत्तर ऐकताच सर्वांमध्ये हास्याची लाट पसरते.
नंतर नेहा आणि बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य शिवच्या एकशे एकोणसत्तर गर्लफ्रेंड होत्या असे म्हणतात. ते ऐकून जितेंद्र आश्चर्यचकित होता. पण शिवच्या तोंडावरील हावभाव पाहून सर्वांनाच हसू येते. शिवला कॉलेजमध्ये चॉकलेट देणाऱ्या गर्लफ्रेंड वेगळ्या होत्या आणि त्याला अभ्यासात मदत करणाऱ्या गर्लफेंड वेगळ्या असल्याचा त्याने म्हटले.