वायसीएम रुग्णालयाचा विद्युत पुरवठा दिवसभर खंडीत; शवविच्छेदन विभागातही अडथळा
![Doctor positive after taking corona vaccine; Incident in Pimpri-Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/ycm-photo.jpg)
- अत्यावश्यक विभागात जनरेटर व युपीएसद्वारे वीज पुरवठा सुरु
- शवविच्छेदन विभागात शवगृहही बंद
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा आज (रविवारी) सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. रुग्णालयातील आयुसीेयू,गायनॅक, अत्यावश्यक आॅपरेशन विभाग हे जनरेटर, युपीएसवर जोडण्यात आले असून अत्यावश्यक आॅपरेशन तेवढे करण्यात येणार आहेत मात्र, अन्य सर्व जनरल वाॅर्डाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने रुग्णासह नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रविवारी (दि.20) सकाळीपासूनच विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. वायसीएम रुग्णालयाच्या अत्यावश्यक काही विभाग वगळता सर्वच विभागाचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. रुग्णालयातील विविध पॅनेल ना-दुरुस्त झाल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची परवानगी घेवून एमएससीबी विभागाच्या कर्मचा-यांना दक्ष ठेवून नवीन पॅनेलसह विविध विभागाचे काम तात्काळ हाती घेतले आहे.
वायसीएम रुग्णालयातील अत्यावश्यक दोन आयसीयु, आॅपरेशन थिएटर, लॅब, लहान मुलांसह गायनॅक विभागात जनरेटर, युपीएस जोडून तात्पुरता वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. तर अन्य सर्व विभागात वीज गेल्याने फॅनसह अन्य यंत्रणाना बंद आहेत. त्यामुळे रुग्णासह नातेवाईकांनी नाराजी व्यक्त करत आहेत. त्याशिवाय शवविच्छेदन विभागातील वीज पुरवठा खंडीत केला आहे. तेथील डाॅक्टरांनी सकाळी दहापर्यंत सर्वच मृतांचे शवविच्छेदन उरकण्यात आले. आता अत्यावश्यक एखादी बाॅडी आल्यास त्यानंतर त्या बाॅडीला शवगृहात ठेवण्यास अडथळा येणार आहे.
याबाबत वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. पदमाकर पंडीत म्हणाले की, वायसीएम रुग्णालयाच्या काही पॅनलचे काम करावे लागणार आहे. याविषयी आयुक्तांसह अन्य विद्युत विभागाच्या परवानगी घेवून अगोदरच परिपत्रक काढून विद्युत पुरवठा दिवसभर खंडीत करण्यात आला आहे. तसेच काही अत्यावश्यक विभागात वीज पुरवठा सुरु आहे. तसेच अत्यावश्यक असल्यास आॅपरेशन थिएटरही चालू करण्यात येईल, विद्युत विभागाचे काम पुर्ण झाल्यास सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहील. असे त्यांनी सांगितले.