Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘राणेंना त्यांचाच पक्षात कोणी किंमत देत नाही तर दुसरे काय देणार’ – काँग्रेस नेते
![Central Government provided Y grade security to Narayan Rane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/3narayan_rane_25.jpg)
नारायण राणेंना भाजपात कोण विचारतंय? , अशी टीका काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी नारायण राणेंवर केली आहे. 2021च्या मार्च महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार, असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. यालाच गायकवाड यांनी सडेतोड उत्तर देिले आहे.
नारायण राणेंना भाजपात कोण विचारतंय? त्यांना त्यांच्याच पक्षात किंमत नाही, तर दुसरे काय देणार. सरकार आले नाही म्हणून त्यांची तडफड सुरू आहे, अशी बोचरी टीका एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. सोबतच, राणे पंचांग घेऊन बसले आहेत. दरवेळी नव्या तारखा देण्यात काय तथ्य?, असा प्रश्न देखील त्यांनी केला. याआधी देखील राणेंनी सप्टेंबर अखेरपर्यंत हे सरकार कोसळणार असा दावा केला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे.