Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

येत्या शुक्रवारी पुण्याचा पाणी पुरवठा राहणार बंद

जलशुद्धीकरण केंद्रांची विविध कामे करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 7) बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला होता. मात्र, याला नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आता गुरुवारऐवजी शुक्रवारी (दि.8) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर पंपिंग येथील पंपिंग, स्थापत्य, तसेच देखभाल व दुरुस्तीविषयक तातडीची कामे करण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी (दि. 7) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची आणि शुक्रवारी (दि. 8) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती.

मात्र, त्यात मंगळवारी सायंकाळी अचानक बदल करण्यात आला. तांत्रिक कारण देत शहरातील पाणीपुरवठा गुरुवारऐवजी शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. लग्नाचा मोठा मुहूर्त असल्याने नगरसेवकांनी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यास विरोध केला. त्यानुसार प्रशासनाने बदल केल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button