मृत्यूपर्यंत लढा देणार; मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे ट्विट
![Renu Sharma lawyer says Dhananjay Munde thretened Sharma family for withdrawing case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Renu-Sharma-tweets-about-Dhananjay-Munde-over-rape-allegations.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहे. महिलेच्या आरोपानंतर मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीसोबत आपण परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असाही खुलासा त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.
मुंडेवर आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांनी आता एकामागोमाग एक ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मृत्यूपर्यंत आपण लढा देत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी मला तक्रारीच्या काहीदिवस आधीच सोशल मीडियावर का ब्लॉक केले ? असा प्रश्न उपस्थित करत पोलीस चौकशीनंतर सर्व समोर येईल असे म्हटले आहे.
तसेच रेणू शर्मा यांनी म्हटले आहे की, ब्लॅकमेलच्या मुद्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची धनंजय मुंडे मदत घेऊ शकत नाही, पण मी मृत्यूपर्यंत लढा देईल.
एका ट्विटर युजरला उत्तर देताना ढोंगीला शिक्षा नक्की मिळणार, असेही त्यांनी म्हटले आहे.