‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची तयारी
![BJP leader answer Samana editorial on Bhandara hospital tragedy says...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/uddhav-winner-650_112619101405.jpg)
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी भाजपबरोबर आता शिवसेनेनेही कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही ? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र भाजपने पालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून नव्या डावपेचाची आखणी केली जात आहे. यासाठी शिवसेना गुजराती मतदारांना जवळ करताना दिसत आहे.
शिवसेना संघटक हेमराज भाई शाह यांच्या नेतृत्वात गुजराती बांधवांचा येत्या 10 जानेवारीला तारखेला खास मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शेकडो गुजराती बांधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपची पारंपरिक मते असणारा मुंबईतला गुजराती आणि मारवाडी समाज ओळखला जातो. आता याच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा शिवसेना प्रयत्न करताना दिसत आहे.
10 तारखेला होणाऱ्या या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे.