Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मानाची स्पर्धा महाराष्ट्र केसरी होणार ‘या’ अटीवर
![Maharashtra government gives permission to Maharashtra kesari competition 2021](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Maharashtra-government-gives-permission-to-Maharashtra-kesari-competition-2021.jpg)
कोरोनाचे सावट हळूहळू दूर होत असताना विविध खेळाच्या स्पर्धांसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्ती स्पर्धा होणार हे पक्क झाले आहे. राज्य सरकारने प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा भरवण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. फेब्रुवारी अखेरीस ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडण्याची शक्यता आहे. हिंदकेसरी आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य पै. योगेश दोडके यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच यासाठी निवड चाचणीला सुरुवात होईल, अशी माहिती दोडके यांनी दिली.