Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबई
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शासकीय विमान नाकारले
- मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शासकीय विमान नाकारले गेले आहे. देहरादूनला जाण्यासाठी आधी विमानाची नोंदणी करण्यात आली होती. मात्र राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल स्पाईस जेटच्या विमानाने रवाना झाले. मसुरीला IAS प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रमासाठी राज्यपाल निघाले होते. पण विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातील वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे. याआधी देखील अनेक मुद्द्यावर महाविकासआघाडीमधील नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली होती. तर राज्यपाल यांनी ही ठाकरे सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे असं वक्तव्य केलं होतं.
राज्यपाल विरूद्ध महाविकासआघाडी सरकार वाद आता शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकार सत्तेत येण्यापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पाहायला मिळतो आहे. अनेक मुद्द्यांवर महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल आमने-सामने आले आहेत.