Uncategorized
मनसेची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोहीम फेल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/pune-mns-25.jpg)
पुणे | महाईन्यूज
बांगलादेशी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यात सुरू केलेलं सर्च ऑपरेशन फेल ठरलं आहे. बांगलादेशी घुसखोर म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिलेले नागरिक भारतीय निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसैनिकांनी काल शनिवारी (दि. 22) पुण्यात काही संशयित बांगलादेशी म्हणून काही जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांची मतदान कार्ड आणि आधार कार्ड मागितली. त्यातील दोनजण पश्चिम बंगालमधील पांडुवा जिल्ह्यातील आहेत. तर, एकजण उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. यावरुन मनसेने पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधात राबवलेली मोहीम फेल ठरल्याचं पाहायला मिळत आहे.