भोसरीच्या विधानसभा आखाड्यात नवा चेहरा ; आजी-माजी आमदारांना फोडणार घाम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/jalindra-shinde.jpg)
– वाढदिवसानिमित्त होर्डिंग्जद्वारे ठोकला शड्डू
पिंपरी ( महा ई न्यूज ) – भोसरी विधानसभा आखाड्यात आता नव्या चेह-याने उडी घेतलीय, गावकी-भावकीच्या राजकारणात माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी वाढदिवसाचे अैाचित्य साधून होर्डिग्जद्वारे जोरदार ब्रॅंर्डिंग केलंय, त्यामुळे भोसरीच्या आखाड्यात आजी-माजी आमदारांना समाविष्ट गावातील तगड्या उमेदवारांसह भोसरी गावातील पैलवानाशी सामना करावा लागणार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीअगोदर विधानसभा आखाड्याची रंगत वाढत चालली आहे.
भोसरी विधानसभा आखाड्यात जालिंदर शिंदे यांनी उतरण्याचा निर्णय घेतलाय, आगामी आॅक्टोबर 2019 मधील विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आतापासून सुरु झालीय, शिंदे हे २०१२ मध्ये ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवूनही त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांचा भोसरीतील राजकारणात प्रभाव कायम टिकून आहे.
शिंदे यांनी आता लक्ष्य २०१९ विधानसभेचा नारा दिलाय. त्यांनी वाढदिवसाचे अैाचित्य साधून भोसरी विधानसभा आखाड्यात शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केलीय, फ्लेक्सबाजी व जनसंपर्क माध्यमातून त्यांनी राजकीय ताकदपणाला लावलीय, तसेच त्यांनी शिवधनुष्य हाती घेणार असल्याचीही चर्चा आहे. शिंदे विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांची डोकेदुखी निश्चित वाढणार आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांच्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वाढदिवसानिमित्त केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे भोसरीगावातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका आजी-माजी आमदारांना डोकेदुखी वाढविणारा आहे. याशिवाय सामाविष्ट गावातील उमेदवारही रिंगणात उतरविल्यास कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.