Breaking-newsUncategorizedताज्या घडामोडी
भारत-चीन वादात ट्रम्प यांनी दिली मध्यस्थीची ऑफर
![trump And Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Modi-And-Trump.jpg)
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. एकीकडे भारताकडून चर्चेचा मार्ग अवलंबला जात असला तरी चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहे.
अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणी सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सध्या सुरु असलेला सीमावाद सोडविण्यास तयार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आशियातील दोन मोठ्या देशांना यासाठी मदत करण्याच्या प्रस्तावाचा त्यांनी पुनर्रुच्चार केला