भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल; 2018 सालचे प्रकरण
![भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Girish-Mahajan.jpg)
भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2018 सालच्या एका प्रकरणात चाकुचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आलेला आहे. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी गिरीश महाजन यांनी धमकावल्याचा आरोप समोर येत आहे.
मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी गिरीश महाजन यांनी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाजन यांच्यावर अॅड. विजय पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
वाचाः पुढील 2 वर्षात देश टोलनाकामुक्त होणार – नितीन गडकरीं
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा ताबा मिळवण्यासाठी तानाजी भोईटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने जानेवारी 2018 मध्ये पुण्यात बोलावून घेतलं होतं. तिथे मला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. सर्व संचालक मंडळातील सर्व सदस्यांचे राजीनामे घेऊन संस्थेचा कारभार आमदार गिरीश महाजन यांच्या हातात द्यावा, अशी धमकी दिली. त्याचवेळी आमदार गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉल करून 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असं अॅड. विजय पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतरही भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.