Uncategorizedपुणे

बायकोसाठी चोऱ्या करणारा नवरा अटकेत

नवविवाहीत बायकोसाठी मोबाईल, दुचाकी, चारचाकी चोरीनंतर लग्नसराई, जागरण गोंधळात घुसून महागड्या साड्या, ऐवज चोरणाऱ्या अट्टल चोराला युनिट 5 च्या पोलिसांनी अटक केली आहे.

रोहन बिरू सोनटक्के (वय 21, रा.वारजे माळवाडी) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याने आतापर्यंत शहर आणि राज्यभरात 9 ठिकाणी चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून 18 मोबाईल, 3 लॅपटॉप, काही दुचाकी-चारचाकी गाड्यांच्या चाव्या असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

आरोपी सोमवारी (दि.28) सकाळी ॲमेेनोरा मॉलच्या पाठीमागे चोरी केलेला मोबईल विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती युनिट 5 कडून मिळाली होती.

त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे अशोक मोराळे, पोलिस उपआयुक्त बच्चनसिंग यांच्या सुचनेनुसार गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ट पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेत्तृत्वाखालील पथकाने त्याला अटक केली.

सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलिस अंमलदार महेश वाघमारे, प्रविण काळभोर, राजेंद्र भोरडे, अश्रुबा मोराळे, दत्तात्रय ठोंबरे, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, विशाल भिलारे, विशाल खंदारे, संजय दळवी आदी या पथका होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button