पैशासाठी बेरोजगार युवकाकडून पिंपरीतील साबण व्यापा-यांचा खून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/20180510_130510.jpg)
पिंपरी – पिंपरीतील साबण व्यापारी प्रदीप इंगोरानी (वय 52, रा. पिंपरी मार्केट) यांचा राहत्या घरात गळा दाबून खुन केला. त्या प्रकरणी सोलापूरच्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्यांने गुन्हा कबूल केला आहे. दरम्यान, नोकरी नसल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्याला दोन लाखांची गरज होती. मात्र, संबंधित व्यापा-याकडे त्याने पैसे मागितले, परंतू, त्यांने पैसे न दिल्याने त्या व्यापा-याचा पंच्या सारख्या कपड्याने गळा आव खून केला आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक मसाजी काळे आदी उपस्थित होते. याप्रकरणी सोलापूर येथून सचिन भालेराव (वय 35) पोलीस पथकाने अटक केली आहे. आरोपीला पिंपरी न्यायालयात हजर केले असता 14 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
शिंदे म्हणाले की, मयत प्रदीप विरुमन हिंगोरानी (वय-५१ रा.पिंपरी मार्केट) यांचा साबणाचा व्यवसाय होता. त्रयस्थ व्यक्तीने आरोपी सचिन भालेराव (वय-३३ रा.सोलापूर) याची ओळख साबण व्यापाऱ्याशी करून दिली होती. तसेच याच्याकडे नेहमी पैसे असतात असं आरोपीला सांगण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून आरोपी सचिन याचे हलाकीचे दिवस सुरू होते, त्याच्यावर कर्ज आणि दोन मुलांच्या शाळेची फि भरायची असल्याने मोठं आर्थिक संकट आलं होतं. आरोपीची पत्नी मावळ येथे परिचारिका म्हणून काम करते, तिला महिना आठ हजार रुपये मिळतात, त्यामुळे घर भागत नव्हतं. तर आरोपी सचिन हा कंपनीशी निगडित काम करायचा त्यामुळे त्याला महिन्याकाठी लाख भर रुपये मिळायचे परंतु तेही येन ठप्प झालं.
दिनांक १ मे रोजी मध्यरात्री साबण व्यापारी प्रदीप विरुमन हिंगोराणी यांच्या निवासस्थानी जाऊन आरोपी सचिन भालेराव याने दोन लाख रुपये देण्याची विनवणी केली. बराच वेळ झाला तरी आरोपी सचिन हा विनवणी करत होता. अखेर पैसे न दिल्याने हताश झालेल्या सचिनने शेजारी असलेल्या टॉवेलने साबण व्यापारी याचा गळा आवळून हत्या केली आणि घरात असलेले ३८ हजार रुपये घेऊन पळ काढला. परिसरातील सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला. त्यानुसार तपास करत आरोपी सचिनला सोलापूर येथून अटक करण्यात आली.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे,पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव,गुन्हे पोलीस निरीक्षक मसाजी काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास मुंढे,पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे,सागर पाटील,आदींनी केली आहे.