Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या शाळेचा कारभार आता पडद्याआडून चालणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समिती सभापतींनी प्राथमिक शाळांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. पाहणी दौ-यात शाळा मुख्याध्यापकांच्या दालनामध्ये धूळ दिसल्याने त्यांनी तत्काळ खिडक्यांना पडदे बसविण्याचा ठराव समितीच्या सभेत मंजूर केला. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाचा कारभार आता पडद्याआडून चालणार आहे.

सभापतींचा शाळा दौरा होत असताना त्यांना मुख्याध्यापक, संगणक कक्ष, ग्रंथालय आदी खोल्यांच्या कार्यालयात धूळ बसलेली त्यांच्या निदर्शनास आली. त्यावर तातडीने सभापती मनिषा पवार यांनी पडदे बसविण्याचा ठराव सभेसमोर आणला. त्याला आज झालेल्या सभेत मंजुरी देखील दिली. त्यामुळे शाळेचा कारभार आता पडद्याआडून चालणार आहे, अशी टिका केली जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button