Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडी

धक्कादायक! कोरोना रुग्णाचा प्लाझ्मा दिल्याने झाला मृत्यू; पोस्टमॉर्टेममध्ये चक्क करणारा खुलासा

कोरोना रुग्णांना उपचार म्हणून प्लाझ्मा थेरेपी दिली जाते. कोरोनाग्रस्त रुग्णांना कोरोनामुक्त रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा दिल्याने कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या कोरोनाविरोधातील अँटिबॉडी कोरोना रुग्णाला मिळतील आणि त्यांनाही कोरोनाशी लढता येईल. मात्र जीव वाचवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या या प्लाझ्मानेच कोरोना रुग्णाचा जीव घेतला आहे. कोरोना रुग्णाला प्लाझ्मा चढवताच त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात ग्वालिअरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

ग्वालिअरमध्ये कोरोना रुग्णाला प्लाझ्मा चढवल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.  मनोज गुप्ता असं या रुग्णाचं नाव आहे. त्याला अपोलो रुग्णालात प्लाझ्मा देण्यात आला. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि 10 डिसेंबरला मृत्यू झाला. प्लाझ्मा चढल्यानंतर दोन दिवसांतच मृत्यू झाला. त्यामुळे प्लाझ्मामध्येच काहीतरी गडबड होती असा आरोप मृताच्या कुटुंबानं केला.

वाचाः पाहा कोहलीची ‘ती’ ऑडी कार; आता आहे धूळखात पडलेली

आज तकच्या रिपोर्टनुसार, मृताच्या कुटुंबानं आरोप केला आहे की, त्यांनी जयारोग्य रुग्णालयातून 18 हजार रुपयांना प्लाझ्मा खरेदी केले होते. कुटुंबानं यावरून गोंधळ घातल्यावर एक समिती गठीत करण्यात आली. प्लाझ्माची तपासणी आणि मृताचं पोस्टमॉर्टेमही करण्यात आलं. त्यावेळी मनोज गुप्ता यांना खराब प्लाझ्मा चढवण्यात आलं होतं, असा धक्कादायक खुलासा झाला. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये त्याच्या रक्तात संक्रमण झाल्याचं आढळलं. प्लाझ्मा चढवल्यानंतर हे संक्रमण झालं होतं. यानंतर दोन दिवसांतच त्याचा मृत्यू झाला.

पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मिळाल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय त्यागी, जगदी आणि महेंद्र अशी या आरोपींची नावं आहे. अजय त्यागी हा मुख्य आरोपी असून तो जयारोग्य रुग्णालयातील लॅब अटेंडर मनीष त्यागीचा भाऊ आहे. तिघांनाही ताब्यात घेतलं आहे.  अजयची चौकशी सुरू करण्यात आली आहे. क्राइम ब्रांच, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानं या प्रकरणात कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

वाचाः मराठा आणि ओबीसी समाजासाठी महत्त्वाचे निर्णय; महाज्योती, सारथीसाठी कोट्यवधींची तरतूद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button