चित्रपट निर्मात्याची ५८ कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल
![Pune crime 58 Cr rupees fraud with film producer FIR filed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/CRIME-KADI-5.jpg)
पुणे येथे एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची तब्बल ५८ कोटी ५० लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ब्रँडच्या नावाचा उपयोग करून अटी व शर्तीचा भंग करून फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजकाच्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०१६ ते जानेवारी २०२१ कालावधीत घडली.
सचिन जगदीशप्रसाद जोशी (रा. हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पराग मधु संघवी (वय ४८ रा. इंडस हाऊस, न्यु लिंक अंधेरी पश्चिम) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग संघवी आहेत.
काही महिन्यांपुर्वी आरोपी सचिन जोशी यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माता पराग यांच्या प्लेबॉय बिर गार्डन दुकान, कोरेगाव पार्क पुणे, बिहार गार्डनसह हिंदुस्थानात असणा-या वायकिंग मिडीया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड सोबत ब्रॅडचा करार केला. मात्र, सचिनने करारामधील अटींचा भंग करून पराग यांच्या कंपनीच्या बोधचिन्हाच्या नावावर मिळालेल्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस तपास करीत आहेत.