गायक कार्तिकी गायकवाड अडकली विवाहबंधनात; प्राजक्ता गायकवाडची हजेरी
![SAREGAMAPA little champ winner got married](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/SAREGAMAPA-little-champ-winner-got-married.jpg)
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड ही विवाहबंधनात अडकली. व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. जुलै महिन्यात कार्तिकीचा साखरपुडा पार पडला होता. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तिचा व रोनितचा विवाहसोहळा पार पडला.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गायिका आर्या आंबेकर यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. सोशल मीडियावर त्यांनी लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.कार्तिकी आणि तिचे वडील गायक-संगीतकार कल्याणजी गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लग्नाचं निमंत्रण दिलं होतं.
‘घागर घेऊन’, ‘नवरी नटली’ यांसारख्या गाण्यांनी रसिकांना वेड लावले. लॉकडाउनच्या काळात म्हणजेच जुलै महिन्याच्या सुरुवातीला कार्तिकीचा शुभविवाह ठरला आणि साखरपुडाही पार पडला. कार्तिकीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही सुखद बातमी दिली होती.
कार्तिकिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे तोही उत्तम तबलावादक आहे. गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीतवारसा पुढे नेत आहे.