Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोरोनानंतर बर्ड फ्लूचं थैमान; ‘या’ राज्यांत आढळल्या केसेस
![Bird Flu enters Maharashtra found cases in Mumbai, Thane, Parbhani, Beed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/After-corona-Bird-flu-cases-found-all-over-India.jpg)
कोरोनाचे संकट संपूष्टात येतच होते की आता नवं संकट उभं राहिलं आहे. देशभर आता बर्ड फ्लूचं थैमान घातलेले दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये बर्ड फ्ल्यूच्या केसेस आढळून आल्या आहेत. तर बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेथे मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. बर्ड फ्लूचा धोका आणि मानवामध्येही याच्या संसर्गाचा धोका असल्यामुळं खबरदारी म्हणून हा उपाय केला आहे.
पण महाराष्ट्रात अद्याप तरी केस आढळून आलेली नाही. महाराष्ट्रात मात्र अद्यापही अशा संसर्गाचं निरिक्षण नसल्यामुळं तुर्तास बर्ड फ्लूचा धोका नसल्याचं स्पष्ट होत आहे.