Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ईडीची नोटीस आल्यानंतर मला…; खडसेंनी केला खुलासा

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ED ने नोटीस पाठवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर खुद्द एकनाथ खडसे यांनीच खुलासा केला आहे. होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. “धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना हे आवडत नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

लोकांना असं वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचं असतं, असं एकनाथ खडसे म्हणाले.

एकीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ED ने नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता थेट ईडी आणि CBI यांनाच कोर्टात खेचण्याचा पवित्रा घेतला आहे. ईडी, (ED) सीबीआयविरोधात (CBI) कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button