Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आज राज्यातील 30 जिल्ह्यात कोरोना लसीची ड्राय रन
कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपली आहे. भारतात केंद्र सरकारकडून कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. ही लस 90 टक्के यशस्वी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
आता लवकरच संपूर्ण देशात कोरोना लसीच्या मूळ लसीकरणास सुरुवात होणार आहे. यापूर्वी लसीकरणाची रंगीत तालीम, अर्थात ड्राय रन संपूर्ण देशात पार पडत आहे. महाराष्ट्राच्या 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे.





