आगामी महानगरपालिका निवडणुक काँग्रेस पक्ष ‘अशी’ लढवणार, भाई जगताप यांनी केलं जाहीर
![Bhai Jagtap reveals his strategy for upcoming BMC election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Bhai-Jagtap.jpg)
मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्व 227 जागांवर स्वबळावर लढण्याचे मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीर केले आहे. भाई जगताप यांनी शुक्रवारी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भात चाचपणी झाल्याची चर्चा होती. मात्र, आता भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचं जाहीर केलं आहे.
वाचाः सरकार गोरगरिबांच आहे की दारुवाल्यांचं? भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल
मराठा आरक्षण हा भावनिक आणि गुंतागुंतीचा विषय आहे. आरक्षण देण्याचं काम महाविकास आघाडीने केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील समाजात या मुद्द्यावरुन तेढ निर्माण करु नये, अशी माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.
महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना केवळ…
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. आज शेतकरी आंदोलनाचा 29 वा दिवस आहे. आतापर्यंत 25 पेक्षा अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना शेतकऱ्यांचा संप झाला, राज्यात पूर आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी केवळ हवाई पाहणी केली. त्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे वाटप झाले नाही, असा आरोप भाई जगताप यांनी केला.