आकुर्डी पालखी तळावर सुविधाचा अभाव ; वारक-याना तत्परतेने सेवा द्या, आयुक्तांच्या सुचना
पिंपरी – आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी येते. यावेळी पालखी सोबत आलेल्या वारक-यांना महापालिकेकडून सोयी-सुविधा पुरविल्या जातात. परंतू, नगरसेवक जावेद शेख यांनी पालखी तळावर असुविधाचा अभाव असल्याचे आयुक्तांना दिले. यावर वारक-यांना अधिक सक्षमपणे नागरी सुविधा द्यावा, अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आकुर्डीतील विठ्ठल मंदिर परिसरात संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असते. या पालखी तळावर अद्याप मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या नसल्याचे पत्र नगरसेवक जावेद शेख यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले. त्यामुळे आयुक्तांनी पदाधिका-यासमवेत निगडी, भक्ती-शक्ती परिसर व आकुर्डी गावठाण येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणची आज (मंगळवारी) पाहणी केली.
यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक जावेद शेख, प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, मीनल यादव, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.
आयुक्त हर्डिकर म्हणाले की, संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात 6 जुलैला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 7 जुलैला आगमन होणार आहे. या आगमनानंतर भक्ती-शक्ती चाैक ते आकुर्डीचे पालखी मुक्काम स्थळावर कसल्याही कमतरतेची उणिवा भासणार नाही. याकरिता पाणी, वीज, शाैचालये, अन्य मुलभूत सुविधासह आवश्यक लागणा-या सुविधा पुरविण्यात याव्यात. सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्या समन्वयाने पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात यावे, संबधित प्रत्येक अधिका- यांनी आपआपली जबाबदारी पार पाडून हा सोहळा यशस्वी पार पाडण्याच्या सुचना दिल्या आहेत.