अरबाज, सोहेल, निर्वाण खानविरोधात BMCकडून गुन्हा दाखल
![Sohail khan, Arbaj khan, Nirvan Khan FIR registered at Khar Police station](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Sohail-khan-Arbaj-khan-Nirvan-Khan-FIR-registered-at-Khar-Police-station.jpg)
अभिनेता तसेच निर्माता अरबाज खान, सोहेल खानसह सोहेलचा मुलगा निर्वाण खान अडचणीत सापडले आहेत. मुंबई महापालिकेकडून या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई एअरपोर्टवर बीएमसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप या तिघांवर आहे. 25 तारखेला हे तिघे यूएईवरुन मुंबई आले होते. त्यावेळी या तिघांनी एअरपोर्टवरील हॉटेल ताज लॅंडसएंडमध्ये क्वारंटाईन होण्याचं सांगितलं होतं, मात्र हे तिघे तेथे न जाता परस्पर घरी निघून गेले. 26 डिसेंबरला चौकशी केली असता ही माहिती समोर आली.
मुंबई पोलिस प्रवक्ता DCP चैतन्य एस यांनी सांगितलं की, सोहेल, अरबाज आणि निर्वाण खान विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं होतं, मात्र त्यांनी तसं न करता ते घरी गेले. त्यामुळं त्यांच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अरबाज आणि सोहेलला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती आहे. याप्रकरणी आता या तिघांना भायखळातील क्वारंटाईन सेंटरला सुद्धा नेण्यात येणार आहे. 9 जानेवारीपर्यंत त्यांना तिथं ठेवण्यात येणार आहे.