breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

केरळमध्ये दोन दिवसात दोन नेत्यांच्या हत्या; भाजपा नेत्याच्या हत्येनंतर जिल्ह्यात खळबळ !

केरळ |

केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात रविवारी एका भाजपा नेत्याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (SDPI) नेत्याची हत्या करण्यात आल्यानतंर दुसऱ्याच दिवशी भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली. त्यांच्यावरही हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. एकाच जिल्ह्यात दोन दिवसात दोन नेत्यांची हत्या झाल्याने खळबळ माजली असून तणावपूर्ण स्थिती आहे. दोन्ही हत्यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अलप्पुझा जिल्ह्यात दोन दिवसांसाठी १४४ कलम लागू करण्यात आलं आहे.

शनिवारी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव के एस खान यांच्यावर एका अज्ञात गँगने हल्ला केला. ते आपल्या घरी जात असताना एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांनी कोचीमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ४० टक्के जखमी झाले होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष एम के फैजी यांनी आरएसएसच्या सदस्यांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या हत्यांप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. “इतकी छोटी मनोवृत्ती असणारे आणि अमानवीय कृत्य राज्याची प्रतिमा मलीन करणारे आहेत. या हल्लेखोरांना आणि त्यांच्यातील द्वेषभावना समाजापासून दूर ठेवली पाहिजे,” असं ते म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button