breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीने मागवलेल्या ऑनलाईन जेवणात आढळले दोन मृत झुरळ

नवी दिल्ली – स्विगीवरून मागवलेल्या पार्सलमध्ये तामिळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला दोन मृत झुरळ आढळल्याची किळसवाणी घटना घडली आहे. अभिनेत्री निवेथा पेठूराजने स्विगीवरून जेवण ऑर्डर केलं होतं. जेव्हा तिने पार्सल ओपन केलं तेव्हा तिला पार्सलमध्ये दोन मृत झुरळ दिसले. त्यानंतर निवेथाने तात्काळ सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आणि कॅप्शमध्ये म्हटले, ‘मला माहिती नाही स्विगी इंडिया आणि निगडीत रेस्टॉरंटचा काय दर्जा आहे…’

त्याचबरोबर निवेथा पुढे म्हणाली, ‘माझ्या जेवणात मला दोनवेळा झुरळ आढळले आहेत. अशा रेस्टॉरंटवर कडक कारवाई व्हायला हवी. शिवाय अशा रेस्टोरेंट्सवर दंडदेखील आकारायला हवा.’ दरम्यान, निवेथाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून याबाबत स्विगीने माफीदेखील मागितली आहे.

कंपनीने मेलमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळे आम्ही आभारी आहोत. आम्ही तुमच्या संयमाची काळजी घेऊ. आमची टीम मार्वल यावर कारवाई करेल. काळजी करू नका, ही तक्रार रेस्टॉरंटमध्ये पाठविली गेली आहे.’

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button