TOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेश

ट्विटरकडून पत्रकारांचे अकाऊंट्स सस्पेंड, अकाऊंट बंद करण्यावर एलॉन मस्कचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली ः एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. ट्विटरमधील कर्मचारी कपातीपासुन ते ब्लू टीकपर्यंत अनेक बदल एलॉन मस्क यांनी केले असून, महत्वपूर्ण निर्णयही घेतले आहेत. अशातच आता ट्विटरने काही पत्रकारांचे अकाऊंट्स सस्पेंड केल्याची माहिती समोर येत आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. ट्विटरमधील कर्मचारी कपातीपासुन ते ब्लू टीकपर्यंत अनेक बदल एलॉन मस्क यांनी केले असून, महत्वपूर्ण निर्णयही घेतले आहेत. अशातच आता ट्विटरने काही पत्रकारांचे अकाऊंट्स सस्पेंड केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट्सच्या काही पत्रकारांचे अकाऊंट्स सस्पेंड केले आहेत. त्यांच्या या निर्णयांनंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केले. त्यावर एका युझरला एलॉन मस्क यांनी उत्तर दिले. ‘जे नियम इतरांनी आहेत, तेच नियम पत्रकारांना लागू होतात’, असे उत्तर एलॉन मस्क यांनी दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरचे अकाऊंट्स संस्पेंड केल्यानंतर एका युझरला उत्तर देताना एलॉन मस्क यांनी सांगितले की, “डॉक्सिंगचे नियम इतर सर्वांप्रमाणेच पत्रकारांना लागू होतात. ट्विटरच्या नियमांनुसार वैयक्तिक माहिती शेअर करणे याला डॉक्सिंग म्हणतात. दिवसभर माझ्यावर टीका करणे पूर्णपणे ठीक आहे, पण माझी वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे, तसंच माझ्या परिवाराला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचं आहे”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button