breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: चिंताजनक! दोन दिवसात ७८ करोना रुग्णांचा मृत्यू

नगर |

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ८ हजार ४१ जण करोनाबाधित आढळले, तर ७ हजार ४९२ करोनामुक्त झाले. दोन दिवसात उपचार घेणाऱ्या ७८ जणांचा मृत्यू झाला. आज, रविवारी संगमनेरमधील बाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ  होत ती एका दिवसात ५६६ आढळली. जिल्ह्यातील एकूण करोनाबळींची संख्या २ हजार ७१ झाली आहे. आज, रविवारी ३ हजार ७३९ रुग्ण करोनामुक्त झाले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार २९८ झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८५.९२ टक्के  झाले आहे. दरम्यान, आज रुग्णसंख्येत ३ हजार ८२२ ने वाढ झाल्याने उपचारार्थी रुग्णांची संख्या २३ हजार ७१२ झाली आहे. आज आढळलेले बाधित पुढीलप्रमाणे- संगमनेर ५६६, नगर शहर ५४७, श्रीगोंदे ३४७, नगर तालुका ३१७, कर्जत २६७, राहाता २५९, कोपरगाव २१०, पारनेर २०१, अकोले १९२, राहुरी १८७, नेवासे १७१, शेवगाव १५५, पाथर्डी १२७, श्रीरामपूर १०४, इतर जिल्ह्यातील ७५, भिंगार ६१, जामखेड १८, लष्करी रुग्णालयातील १४ व राज्याबाहेरील ४.

दरम्यान, आज करोनामुक्त झालेल्यांपैकी पुढीलप्रमाणे :-

मनपा ९४९, अकोले ११५, जामखेड १३७, कर्जत १३७, कोपरगाव १४९, नगर तालुका ३७१, नेवासा २४६, पारनेर १८५, पाथर्डी १०८, राहाता ३०६, राहुरी १८०, संगमनेर २९७,  शेवगाव १३८, श्रीगोंदा १५४,  श्रीरामपूर १५८, भिंगार ७४, मिलिटरी हॉस्पिटल ८, इतर जिल्हा २६ आणि इतर राज्यातील १.

जिल्ह्याची आकडेवारी

बरे झालेली रुग्ण संख्या : १,५७,२९८

उपचार सुरू असलेले रुग्ण : २३७१२

मृत्यू : २०७१

एकूण रुग्ण संख्या : १,८३,०८१

वाचा – #Covid-19: लसीकरणासाठी नागरिकांची आरोग्य केंद्रावर तुफान गर्दी!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button