breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
मुंबई – मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली स्थानकाजवळ एका लोकलमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक थांबली होती. या गाडीचा पेंटाग्राफ बंद पडला होता, त्यामुळे मुंबईकडे येणारी जलद मार्गावरील वाहतूक रखडली होती. तर आतादेखील वाहतूक विस्कळीतच आहे.
दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लोकलमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रवासाची मुभा आहे. त्यातच आज पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला आहे.