breaking-newsमनोरंजन

‘2.0’ च्या मेकअपसाठी का लागले अक्षय कुमारला 4 तास?, हा व्हिडीओ पाहाच

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा बिग बजेट चित्रपट असून चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून त्याची चर्चा रंगली आहे. या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपटातील अक्षयच्या मेकअपचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

अक्षय आणि रजनीकांतचा हा ‘2.0’ चित्रपट रोबोटचा सिक्वल असून या चित्रपटामध्ये अक्षयने खलनायकाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे खलनायक साकारत असताना अक्षयला अभिनयासोबतच प्रचंड मेकअप करावा लागल्याचं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

‘आजवर मी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे अभिनेत्रींप्रमाणेच अभिनेत्यांनाही काही प्रमाणात मेकअप करावा लागतो. मात्र ‘2.0’ साठी मला जो मेकअप करावा लागला आहे. तेवढा मी आतापर्यंत कधीच केला नव्हता. ‘2.0’ मध्ये खलनायक साकारण्यासाठी मला तब्बल ४ तास मेकअप करावा लागत होता. इतकंच नाही तर तो मेकअप रिमुव्ह करण्यासाठी पुन्हा अडीच तास द्यावे लागत होते’, असं अक्षय म्हणाला.

दरम्यान, या चित्रपटामध्ये अक्षयने साकारलेला खलनायक हा आगळ्यावेगळ्या रुपात असून त्याच्या हेअरस्टाईलपासून ते कॉच्युमपर्यंत सारं काही खास आहे. विशेष म्हणजे ‘रुस्तम’, ‘एअरलिफ्ट’, ‘पॅडमॅन’ या सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अक्षय ‘2.0’ मध्ये हटके रुपात दिसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button