ताज्या घडामोडीमुंबई

पर्यटकांवर काळाचा घाला, पाण्याशी खेळणे जीवावर बेतले

पर्यटकांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगलेच जीवावर बेतते. अशा घटना पाहता, वारंवार सांगितले जाते की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता, धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. अशाच प्रकारे काही पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत होते. परंतु, अचानक तेथील पाण्याची पातळी वाढली आणि होत्याचे नव्हते होऊन बसले. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून पाण्याशी खेळणे कसे जीवावर बेतू शकते याची कल्पना येईल. पर्यटकांचा हा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओत काही पर्यटक पाण्यात आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी अचानक पाण्याचा मोठा झोत येतो आणि काही पर्यटकांना प्रवाहाबरोबर घेऊन जातो. हे सर्व काही इतक्या अचानक घडलेय की, लोकांना काही समजलेच नाही. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत लोक आपला जीव वाचवण्यासाठी कसे आरडाओरडा करतायत हे दिसतेय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका खडकावर काही प्रमाणात पाणी असताना मोठ्या संख्येने लोक आनंद लुटताना दिसत आहे. याच दरम्यान पाण्याचा प्रवाह इतका वाढतो की लोक सैरावैरा पळू लागतात. मात्र पुढे गेलेले लोक पाण्याच्या प्रवाहामुळे अडकून राहतात. पाण्याचा प्रवाह इतका वाढतो की ४ ते ५ जण मधोमधो अडकून राहतात. पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर नदीच्या काठावर काही लोक त्यांना बाहेर या बाहेर या सांगत आहेत मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला दिसत आहे. दरम्यान अचानक त्यांचा तोल जातो आणि सगळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जातात. . ही घटना इतकी अचानक घडली की, पाण्यातून बाहेर पडण्यापूर्वीच पाण्याच्या प्रवाहाने भीषण रूप धारण केले आणि त्यामुळे बचावासाठी पुढे आलेले लोकही घाबरले. ही घटना खूप मन हेलावून टाकणारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button