breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाचे कांस्यपदक हुकले

टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे कांस्य पदकाचे स्वप्न भंगले आहे. राणी रामपालच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाला ब्रिटन संघाने ४-३ ने पराभूत केले. भारताच्या लेकींनी या सामन्यात जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले. यासह महिला हॉकीच्या इतिहासात ऑलिम्पिकमधील पहिलेवहिले पदक पटकावण्याच्या आशाही धुळीला मिळाल्या.

कालच भारताच्या पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. पुरुष संघाने जर्मनीचा ५-४ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर महिला हॉकी संघाकडून भारतीयांना प्रचंड अशा होत्या. मात्र आज सामन्याचा पहिला क्वार्टर ग्रेट ब्रिटनने गाजवला. परंतु या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्याच्या १६व्या मिनिटाला ब्रिटनने पहिला गोल केला. Ellie Rayerने फील्ड गोल केला. त्यामुळे भारत ०-१ ने पिछाडी आला. तर लगेचच २४व्या मिनिटाला ब्रिटनने दुसरा गोल केला आहे. Sarah Robertson ने रिवर्स शॉटद्वारे हा गोल केला. मात्र त्यानंतर गुरजीत कौरने भारताला सामन्यात दमदार पुनरागमन करून दिले. २ मिनिटांच्या आत पेनल्टी कॉर्नरद्वारे लागोपाठ दोन गोल केले. त्यानंतर लगेचच भारताच्या वंदना कटारियाने तिसरा गोल करून सामन्यात चुरस आणली. मग ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टरची सुरुवात आक्रमक केली आणि ३२व्या आक्रमक मिनिटाला गोल केला. ब्रिटनकडून वेबने ब्रिटनकडून वेबने गोल करत आपल्या संघाला भारताशी बरोबरी करून दिली. यानंतर भारतला पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु गुरजीत कौरला गोल करण्यात अपयश आले. ब्रिटनने या क्वार्टरमध्ये एक गोल करण्यात यश आले. मात्र भारताकडून गोलकीपर सविता पुनियाने शानदार बचाव केले आणि ब्रिटनला आणखी गोल करण्याची संधी दिली नाही. परंतु त्यानंतर चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच ब्रिटनने चौथा गोल केला. या गोलसह ब्रिटनने ४-३ ने आघाडी मिळवली. मग सामन्याच्या उर्वरित काही मिनिटे अतिशय थरार पाहायला मिळाला. परंतु भारताला गोल करण्यात अपयश आले आणि ब्रिटनने भारतावर रोमांचक विजय मिळवला.

दरम्यान, याआधी भारतीय हॉकी संघाने १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. तेव्हा महिला संघाने चौथा क्रमांक पटकावला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button