breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

आज महाशिवरात्री; जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

मुंबई – आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. वर्षातील सर्व शिवरात्रींमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.

काही कथांनुसार, समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथांनुसार, या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला ‘जलरात्री’ असे संबोधले जाते. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्त्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो, असेही म्हटले जाते.

महाशिवरात्री : ११ मार्च २०२१
माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ : ११ मार्च २०२१ रोजी दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटे.

माघ वद्य चतुर्दशी समाप्ती : १२ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजून २३ मिनिटे.

निशीथकाल : ११ मार्च २०२१ रोजी उत्तर रात्रौ १२ वाजून २४ मिनिटे ते ०१ वाजून १३ मिनिटे.

व्रत पद्धत व विधी
महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा व जागरण ही तीन अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे. बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंब्याची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. ओम नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button