ताज्या घडामोडीपुणे

बीटकॉईनपेक्षा जास्त पैसे देण्याचा दावा करत इंजिनियरची केली १५ लाखांची फसवणूक

पुणे | तुम्हाला बीट कॉईन पेक्षा जादा पैसे दिले जाईल असे आमिष दाखवून, पुण्यातील एका इंजिनियरची 15 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धीरज राजाराम धुमाळ वय 48 रा. धायरी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आनंद जुन्नरकर, अपर्णा जुन्नरकर, अतुल पाटील, परशुराम पाटील, रघुनाथ बोडखे आणि अजित शर्मा या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरज राजाराम धुमाळ हे इंजिनिअर असून आरोपी आनंद जुन्नरकर यांच्या ऑफिसमध्ये कामाला होते. डिसेंबर 2017 मध्ये आरोपी आनंद जुन्नरकर याने फिर्यादी धीरज राजाराम धुमाळ यांना मूळ रकमेपेक्षा जादा परतावा दिला जाईल,असे सांगत पैश्याचे आमिष दाखवले. त्यानुसार धीरज धुमाळ यांनी तीन लाख रूपयांची गुंतवणूक केली. त्यावेळी जर्मनीच्या मोनिश क्लासिक (xmro) नावाने चलन करण्यात आले.

त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीकडून पैसे घेण्यात आले. मात्र कालांतराने पैसे मिळत नाही. हे लक्षात आल्यावर आरोपीकडून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावरून आपली तब्बल 15 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादी धीरज धुमाळ यांच्या लक्षात आले. तसेच जे सुरुवातीला तीन लाखांचे चलन केले ते देखील बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर धुमाळ यांनी आमच्याकडे तक्रारी दिली असून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button