breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

यंदाच्या निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला लॉटरी लागण्यामागची ५ प्रमुख करणे!

Lok Sabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे. मात्र विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून जबरदस्त टक्कर मिळत आहे. भाजपच्या ‘अबकी बार ४०० पार’च्या घोषणेचा काही विशेष परिणाम पडला नसल्याचं दिसून येत आहे. याशिवाय मोदी सरकारविरोधी लोकांमध्ये जो काही असंतोष होता, त्याचा संपूर्ण फायदा विरोधी आघाडीला झाल्याचं पहायला मिळतंय. यासाठी आणखी कोणती पाच कारणं महत्त्वाची ठरली, ते पाहुयात..

निवडणुकीचा प्रचार : लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना दोन्ही बाजूंनी कस लावला होता. मात्र आरक्षण संपवण्याच्या आणि संविधान बदलण्याच्या गोष्टींना मुद्दा बनवण्यात विरोधी पक्षांना यश मिळाल्याचं दिसून येत आहे.

स्थानिक पक्षांच्या दबदब्याचा परिणाम : निवडणुकीच्या आधी एका सर्वेक्षणात असं म्हटलं गेलं होतं की भाजपला स्थानिक पक्षांकडून कठोर आव्हान मिळू शकतं आणि देशभरात अशा २०० हून अधिक जागा सांगितल्या गेल्या होत्या. सध्या निकालाच्या कलांमध्येही हेच चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा    –      श्रीरंग बारणेंची विजयी हॅट्रीक! १ लाख ४ हजार १३१ मतांची आघाडी 

मुस्लीम मतदार इंडिया : आघाडीसोबत एक्झिट पोलमध्ये समोर आलेले आकडे आता जरी निकालाच्या कलांशी मिळतेजुळते दिसत नसले तरी, मुस्लीम मतदारांशी संबंधित सर्वेक्षण योग्य ठरतंय. इंडिया आघाडीला सर्वाधित मतं ही मुस्लीम समुदायाकडून मिळाली आहेत, हे स्पष्ट होतंय.

तरुण मतदार एक्झिट : पोलमध्ये तरुणांचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. तर भाजपाचे अधिक मतदार हे ३५ हून अधिक वर्षांच्या वयोगटातील आहेत. १८ ते २५ आणि २५ ते ३५ वयोगटातील मतदारांना बदल आणि त्वरित परिणाम अपेक्षित होता. त्यांचं मत इंडिया आघाडीला मिळाल्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा : काँग्रेसची न्याय स्कीम यावेळी कामी आली, असं म्हणायला हरकत नाही. न्याय योजना तर राहुल गांधींनी २०१९ मध्ये पण आणली होती, मात्र त्याचं महत्त्व ते नीट समजावू शकले नव्हते. यावेळी त्यांनी त्यात आणखी काही गोष्टी जोडल्या आणि त्याचाच फायदा झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button