पिंपरी / चिंचवड

पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने घेतला गळफास

पिंपरी l प्रतिनिधी

लग्नानंतर पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी जावयाला अपमानास्पद वागणूक दिली. फारकतीसाठी दहा लाख रुपयांची मागणी करत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 26 जानेवारी रोजी परंडवाल चौक, देहूगाव येथे घडली.

प्रकाश बाबुराव हरकळ असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश यांची बहीण बेबीसरोज विलास डोके (वय 30, रा. परभणी) यांनी मंगळवारी (दि. 1) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार प्रकाश यांची पत्नी सिंधू प्रकाश हरकळ, सासरे किसन नामदेव शिंदे, सासू राधाबाई शिंदे, मेहुणा संदीप शिंदे, दामोदर शिंदे (सर्व रा. खालापूर. मूळ रा. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ मयत प्रकाश आणि सिंधू यांचा विवाह झाला. विवाहानंतर पत्नी सिंधू आणि तिच्या माहेरच्या लोकांनी प्रकसह यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली. तसेच फारकतीसाठी दहा लाख रुपये देण्याची मागणी करत त्रास दिला. त्यानंतर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देखील आरोपींनी दिली. या त्रासाला कंटाळून प्रकाश यांनी 26 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय डमाळ तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button