breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

माझी ओळख टायगर ग्रुप अन्‌ तानाजीभाऊंमुळेच : युवा सेना पुणे जिल्हाप्रमुख अनिकेत घुले

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम : करमाळा येथे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

पुणे : युवा सेना आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रात पुणे जिल्हयात काम करीत असलो तरी, माझी खरी ओळख टायगर ग्रुप आणि तानाजीभाऊंमुळेच निर्माण झाली. त्यांची मला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची दिशा दिली. त्यामुळे आज मी समाजासाठी काम उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा भावना युवा सेना पुणे जिल्हाप्रमुख अनिकेत घुले यांनी व्यक्त केल्या. 

टागयर ग्रुप महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रचंड काम करणारी सर्वात मोठी तरुणांची संघटना म्हणून ओळखली जाते. संस्थापक तानाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली देशभरात संघटनेचे जाळे विस्तारले आहे. टायगर ग्रुप महाराष्ट्रच्या वतीने अनिकेत घुले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात घुले यांचे करमाळा येथे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

अनिकेत घुले म्हणाले की, तानाजीभाऊंनीच समाजसेवेचे वेड लावले. त्यांनी खांद्यावर हात ठेवला आणि आधार दिला. त्यामुळेच पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात काम करु शकलो. माझ्यासह टायगर ग्रुपच्या सदस्यांच्या नावाचा लौकीक वाढवण्याचे काम तानाजीभाऊंमुळे होत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात तानाजीभाऊंसारखे नेतृत्व तयार झाले, याचे समाधान वाटते. 

वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी…

दरम्यान, अनिकेत घुले यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या सदस्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. शिवभक्त प्रतिष्ठान आणि प्रतापराजे निर्मळ पाटील यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. तसेच, प्रसाद रानवडे यांच्या पुढाकाराने सोमेश्वरवाडी, पाषाण येथे सोमेश्वर मंदिरात अभिषेक व अन्नदान, डॉक्टर व्हेरिफाय डायग्नोस्टिक व क्लिनिक येथे मोफत आरोग्य शिबीर, हिंदवी ऑप्टिकच्या पुढाकाराने मोफत नेत्रतपासणी आणि अल्प दरात चष्मे वाटप, आदिवासी पाड्यावरील महिलांना साडी व लहान मुलांना खाऊ वाटप, अनाथ आश्रमांमध्ये अन्नदान व फळ वाटप, गरिब व्यक्तींना ब्लँकेट व चादर वाटप, तसेच धायरी येथील ज्ञान गंगोत्री मतिमंद मुलांच्या शाळेत अन्नदान करण्यात आले. अभिनेता सागर शेला यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी अल्पदरात संगणक वाटप,  मयूर शिरुपाल यांच्यातर्फे दिपगृह बालनगरी येथील अनाथालयात मदत, अजय ऐवळे यांच्या वतीने गरजू नागरिकांना किरणा वाटप, रितेश शिर्के यांच्या पुढाकाराने श्रीलोचन बालविकास केंद्र येथे अन्नदान व शालेय साहित्य भेट, समीर नदाफ यांच्यातर्फे मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त मिठाई वाटप, दिनेश पाटोळे यांच्यातर्फे श्री बोरमलनाथ गोशाळज्ञ येथे ३०० गायींना चारा वाटप, बाबुराजे सावंत यांच्या पुढाकाराने प्रमिलाबाई नौपतलाल हैंडीकैप सेंटर येथे अन्नदान असे भरगच्च उपक्रम झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button