पिंपरी / चिंचवड

वेश्या व्यवसाय प्रकरणी तिघांवर गुन्हा; एका महिलेची सुटका

पिंपरी l प्रतिनिधी

एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत त्यावर आपली उपजीविका भागवत असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिंसा चौक ते एसकेएफ कंपनीकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या कामिनी हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि. 18) कारवाई करून पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली आहे.

जॅक, बबलू, करण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 28 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे अहिंसा चौक ते एसकेएफ कंपनीकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या कामिनी हॉटेलमध्ये आरोपी एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असून त्यावर आपली उपजीविका भागवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजता हॉटेलमध्ये कारवाई केली. त्यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून तिघांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 370 (3), 34, अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 4, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मकसूद मणेर तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button