breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

दिवाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचा विचार करताय? या ठिकाणांना अवश्य भेट द्या!

Diwali in India : अगदी काहीदिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. या सुट्ट्यांमध्ये अनेकजण कुटुंबासोबत, मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तुम्हीही या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्या फायद्याची आहे. या सुट्ट्यांमध्ये मनसोक्त आनंद लुटण्यासाठी तुम्ही देशातल्या काही खास निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. नेमकं कोणत्या ठिकाणी फिरायला जायला हवं यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात..

दार्जिलिंग : जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी दार्जिलिंग हे एक सर्वात सुंदर ठिकाण आहे. कित्येक पर्यटकांचं म्हणणं आहे की आयुष्यात या ठिकाणी एकदा तरी फिरायला गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्हीही या ठिकाणी गेला नसाल तर या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आवर्जून जावा. ज्या पर्यटकांचं कमी बजेट असेल ते पर्यटक हे ठिकाण नक्की सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही दार्जिलिंग हे ठिकाण सिलेक्ट केलं असेल तुम्ही टायगर हिल, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, पद्मजा नायडू हिमालयन जूलॉजिकल पार्क, चहाची खरेदी, दार्जिलिंग मॉल रोड, पीस पॅगोडा, दार्जिलिंग ऑब्जर्वेटरी हिल, लोकल फूड, ट्रेकिंग आणि हायकिंग या ठिकाणांना भेट देऊ शकता.

दार्जिलिंग येथील काही सुंदर ठिकाण :

टायगर हिल : दार्जिलिंग येथील सर्वात बेस्ट ठिकाण हे टायगर हिल आहे. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक फिरायला येतात. हे ठिकाण जमिनीपासून सुमारे २५९० मीटर उंचीवर आहे. तसेच हे ठिकाण दार्जिलिंगपासून १३ किलोमीटर उंचीवर आहे. या ठिकाणी सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे तेथील कांचनजंगा पर्वतराजीवर उगवणारे सूर्याचे दृश्य आहे. ज्या पर्यटकांना सूर्योदयाचा थरारक अनुभव अनुभवायचा असेल तर त्यांनी टायगर हिल या ठिकाणाला आवश्य भेट दिली पाहिजे.

हेही वाचा – Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ब्लॉक

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे : दार्जिलिंग येथील सुंदर ठिकाणांपैकी हिमालयन रेल्वे हे एक ठिकाण आहे. हिमालयन रेल्वे या ठिकाणाला “टॉय ट्रेन” म्हणूनही ओळखले जाते. तसेच हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखील आहे. पर्यटक टॉय ट्रेनमध्ये प्रवास करून तेथील निसर्गाचा आनंद घेऊ शकता. या हिमालयन रेल्वेने तुम्ही चहाचे मळेदेखील फिरू शकता.

घुम मठ : दर्जिलिंगमध्ये १८५० मध्ये लामा शेराब ग्यात्सो यांनी घूम मठाची स्थापना केली आहे. दर्जिलिंगमधील सर्वात उंच म्हणजेच सुमारे आठ हजार फूट उंचीवर घुम मठ आहे. जुन्या काळात घूम मठाला चोयलिंग असे म्हणत होते. घुम मठ हे एक सर्वात थंड ठिकाण आहे. या घुम मठात प्रार्थनागृह, एक मोठे ग्रंथालय आणि अभ्यासिका देखील आहे.

ऋषिकेश : ऋषिकेशला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य आहात. दिल्ली शहरापासून अवघ्या पाच तासाच्या अंतरावर ऋषिकेश हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर तुम्ही एडवेंचर लव्हर असाल तर तुम्ही या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. या ठिकाणी पर्यटक नद्या, पर्वत, झरे यांचा आनंद घेऊ शकतात. तसेच ऋषिकेशला गेल्यावर तुम्ही वॉटर राफ्टिंग करू शकता. आकर्षणाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम झाला आहे. त्यामुळे या ठिकाणाला त्रिवेणी नावाने ओळखले जाते. तसेच पर्यटक ३० ते ४० फूट उंच खडकावरून थंड पाण्यात उडी मारण्याचा आनंद घेऊ शकता. ऋषिकेशमध्ये भगवान शिव यांचं जगातील सर्वात लोकप्रिय हिंदू मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हे मंदिर स्वर्ग आश्रमापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर आहे. भगवान शिवाचे भक्त या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे ऋषिकेश हे ठिकाण पर्यटकांनी सर्वात जास्त भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.

उदयपूर : भारतातील सर्वात सुंदर अशी ओळख असलेलं शहर हे उदयपूर आहे. उदयपूर शहर हे राजस्थानमधील एक शहर आहे. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून पर्यटक या ठिकाणाला भेट द्यायला येतात. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी येत असतात. हे शहर आकर्षक अशा तलावांसाठी ओळखले जाते. उदयपूर येथील किल्ले आणि राजवाडे वैभवशाली राजपूत राजवटीचे दर्शन घेण्यासाठी नेहमी खुले असतात. उदयपूर शहराची ओळख ही समृद्ध संस्कृती आणि स्वादिष्ट पाककृती आहे. त्यामुळे जर तुम्ही या सुट्ट्यांमध्ये उदयपूर हे ठिकाण निश्चित केले असेल तर तुम्ही योग्य आहात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button