पिंपरी / चिंचवड
देहूरोड मेन बाजारात चोरट्यांनी मेडिकल दुकान फोडले
पिंपरी l प्रतिनिधी
देहूरोड मधील मेन बाजार येथे असलेले गणेश जनरल मेडिकल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानातून चोरटयांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली.
अभिषेक आप्पा खरात (वय 22, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान फिर्यादी खरात यांचे मेनबाजार, देहूरोड येथील गणेश जनरल मेडिकल दुकान हे कुलूप लावून बंद होते. या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून, कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील 46 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.