breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

शांत झोप लागण्यासाठी ‘या’ गोष्टी करणे आवश्यक

आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही. काही कारणांने, टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधेच जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही. त्यामुळे झोप लागण्यासाठी काय केले पाहिजे ते पाहुयात..

ध्यानधारण करणे : झोपेसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ध्यान. त्यामुळे ध्यानधारणा करणे आवश्यक आहे.

मंत्रोच्चार : दिवसातून किमान एकदा तरी ओंकार करावा. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे आपण आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य विचारांना दूर करू शकतो.

योगासने करणे : नियमितपणे योग साधना करणाऱ्या लोकांना झोपेचे कसलेच त्रास होत नाही. दिवसातून किमान वीस मिनिटं योगाची प्रॅक्टिस करून शरीर, मन स्वस्थ ठेवणं हा सवयीचा भाग बनून जातो.

हेही वाचा – ‘महापुरूषांचा अवमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही’; रोहित पवारांची टीका

मसाज करणे : झोपेच्या समस्यांसाठी मसाज हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. नियमितपणे मसाज केल्याने झोपेचा दर्जा तर सुधारतोच पण मसाजमुळे टेन्शन, स्ट्रेस देखील दूर होतात. ज्यामुळे शांत झोप लागण्यासाठी मदत होते.

मॅग्नेशियम : आपल्या आहारातून अनेक प्रकारची खनिजे , व्हिटॅमिन आपल्या शरीरात जात असतात. यापैकी मॅग्नेशियम या खनिजाची आपलाल्या चांगल्या झोपेसाठी गरज असते.

आवडते शांत संगीत ऐकणे : संगीत हा नैसर्गिक पेनकिलर म्हणून ओळखले जाते. शांत संगीतात आपले दुखणे कमी करायची क्षमता असते. संगीतामुळे आपले मन शांत होते.

झोप नीट येत नसेल, किंवा आली तरी सलग शांत झोप होत नसेल तर हे उपाय करून बघा. याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button