breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मनोरा’ आमदार निवासासाठी इतक्या कोटींचा खर्च करून मिळणार या सुविधा

मुंबई : मुंबईमध्ये प्रत्येक आमदारांसाठी एक निवास दिले जाते. आत्ताच्या आमदार निवासाच्या चारही इमारतींची अवस्था धोकादायक झाली असल्याने या इमारती पाडून त्या जागी नवीन इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरातील ‘मनोरा’ आमदार निवासाच्या पुनर्बाधणीचे काम सुरु होणार आहे. या पुनर्बाधणी आमदार निवासाचे आज भूमिपूजन केले जाणार आहे.

‘मनोरा’ आमदार निवासासाठी प्रत्येकी ५.४ वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात आला आहे. या इमारतींचे काम तब्बल चार वर्षे रखडल्याने या आमदार निवासाच्या प्रकल्पाचा खर्च सुमारे ४०० कोटींनी वाढला आहे. आता सुमारे १२०० कोटी खर्चून विधानसभेच्या २८८ तर विधान परिषदेच्या ७८ अशा एकूण ३६८ आमदारांसाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या इमारती ४० व २८ मजल्यांच्या अशा दोन मजल्यांच्या स्वरूपात बांधण्यात येणार आहेत.

हेही वाचा – देशात टोमॅटो ३०० रूपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता?

या इमारतीमध्ये प्रत्येक आमदारासाठी एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका पुरविली जाणार आहे. या नवीन इमारती ‘लार्सन अँड टुब्रो’ ही बांधकाम कंपनी बांधणार आहे. या इमारतीच्या प्रत्येक सदनिकेत किचन, बहुउपयोगी सभागृह, अतिथीगृह, ग्रंथालय, पुस्तकाचे दुकान, क्लब हाऊस, मिनी थिएटर अशा सुविधा आहेत. मनोरा आमदार निवासस्थान पाडल्याने मुंबईबाहेरील आमदारांना निवासस्थानासाठी दरमहा एक लाख रुपये सरकारकडून दिले जातात. त्यातून सरकारच्या तिजोरीवर वर्षांला १०० कोटींचा बोजा पडतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button