breaking-newsआंतरराष्टीय

#CoronoVirus:न्यूयाॅर्कमध्ये 17 हजार मृत्यंूनंतरही बस, मेट्राे सुपर कॅरिअर सेवा सुरूच

काेराेना विषाणूमुळे सर्वात विनाशकारक प्रादुर्भावाचे कारण शाेधण्यात न्यूयाॅर्कला बहुधा यश आले असावे. बस, कॅब, मेट्राेसारख्या सेवेने या आजाराचा प्रादुर्भाव वाढवण्यात सुपर कॅरिअरची भूमिका निभावली. न्यूयाॅर्कमध्ये विषाणू एवढ्या वेगाने का पसरला, त्याला राेखण्यात काय चूक राहून गेली याबाबत गव्हर्नर अँड्रयू क्यूमाे म्हणाले, या विषाणूबद्दल समाेर आलेली नवी माहिती चकित करणारी आहे. त्यानुसार काेराेना हवेत ३ तासांपर्यंत राहू शकताे. मेट्राे, रेल्वे व बसच्या डब्यांच्या पृष्ठभागावर तसेच आसनांवर तीन दिवसांपर्यंत ताे अस्तित्वात राहू शकताे.


ही माहिती न्यूयाॅर्कच्या लाेकांसाठी माेठ्या झटक्यासारखी आहे. कारण कारण येथे अजूनही लाेक मेट्राे, कॅब व रेल्वेने प्रवास करत आहेत. तूर्त तरी हे चक्र थांबणारे नाही असे वाटते, असे क्युमाे यांनी सांगितले. महामारीची दुसरी लाटही येऊ शकते. शुक्रवारी २४ तासांत ३४ हजार ७३६ तपासण्या झाल्या. एकाच राज्यात एका दिवसात सर्वाधिक तपासण्या हाेण्याची ही जगातील पहिली घटना आहे. न्यूयाॅर्कमध्ये ३ लाखांहून जास्त लाेक बाधित आहेत व १७ हजारांहून जास्त लाेकांचे प्राण गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button