पिंपरी / चिंचवड

तळवडे येथील कंपनीत पाच लाखांची चोरी

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीतील शटरचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी कंपनीतून हायड्रोलिक सिलेंडर, एमएस रॅक, शाफ्ट, स्लायडिंग गेट असा एकूण पाच लाख 18 हजार 994 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 23 ते 25 एप्रिल या कालावधीत तळवडे येथील निवा कंपनीत घडली.

चंद्रकांत वामन माने (वय 32, रा. मोहननगर, धनकवडी, पुणे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ज्योतिबा नगर, तळवडे येथे निवा कंपनी आहे. अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या शटरच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून बाथरूमच्या काचा काढून त्यावाटे कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून 16 नग हायड्रोलिक सिलेंडर, एमएस रॅक 64 नग, शाफ्ट 16 नग, स्लायडिंग गेट असा एकूण पाच लाख 18 हजार 994 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button