पिंपरी / चिंचवड

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची सोन्याची साखळी हिसकावली

पिंपरी l प्रतिनिधी

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी जाधववाडी चिखली येथे भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. ती बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या चिंचवड येथील एका तरुणाच्या गळ्यातील 50 हजारांची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी सव्वा बारा वाजता घडली.

सुरज मरगु बोटे (वय 24, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी चिखली येथील रामायण मैदानात आमदार महेश लांडगे यांनी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. ती शर्यत पाहण्यासाठी फिर्यादी सुरज बोटे, त्यांच्या शेजारी राहणारे धनंजय शंकर खांडगे (वय 52), रणवीर श्याम धोत्रे (वय 14) हे गेले होते. बैलगाडा शर्यत पाहत असताना मैदानावर शर्यत पाहणा-या लोकांची गर्दी झाली. त्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाची 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसका मारून तोडून चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button