TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राजकीय प्रवक्त्यांची वक्तव्ये ऐकू नये, पाहूच नये अशीचः राज ठाकरे

मुंबईः राजकारण तुम्ही रोज बघता, राजकारणात रोज अनेक गोष्टींना फाटे फुटत आहेत. यात बोलण्याची पद्धत देखील काय प्रकारची आली आहे, प्रवक्तेपण काय प्रकारे बोलतात, ऐकूच नये पाहूच नये अशा प्रकारच्या गोष्टी वाटायला लागतात. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिले, या हिंद प्रांतावर परकीयांनी आक्रमक केले, या हिंद प्रांतावर इथल्या कुणी राज्य केलं असेल तर ते मराठीशाहीने केलं. तो हा महाराष्ट्र आहे, पण महाराष्ट्राची राजकीय अवस्था बघतो तेव्हा असं वाटत कुठे जातोय आपण फरफटत, कोणामुळे जातोय फरफटत? असं प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत राज ठाकरे बोलत होते.

1995 च्या आधी महाराष्ट्र शांत होता
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येक भाषणावेळी माझ्यावर एक दडपण, अवघडेपण असतं. महाराष्ट्राची सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता तोंडाला आवरून बोलावं अशी समोरच्यांची अपेक्षा असते म्हणून त्याला व्याख्यान म्हणतात. आजचा सोशल मीडिया घ्या, टेलिव्हिजन चॅनल घ्या कधी कधी वाटत एक लेख लिहावा की, 1995 चा महाराष्ट्र आणि 95 नंतरचा महाराष्ट्र त्याचं मूळ इतके आहे ते मूळ तिकडून इकडे आलं. त्याआधी महाराष्ट्रात शांत होता. 1995 आधीचं पुणं काय होत आणि 95 नंतरचं पुणं काय झालं आज? आज चार चार पुणे झाले आहे, असही राज ठाकरे म्हणाले.

जीवावर उठणार बदल काय करायचा?
मुंबई बरबाद होण्यासाठी काही काळ गेला, पण पुणे बरबाद होण्यासाठी वेळ नाही लागणार. तो जो वेग आयुष्यात आला आहे. बदल हा गरजेचा असतो मान्य आहे पण तो जीवावर उठणार असेल तर काय करायचं? 1995 च्या अगोदरच्या काळात सर्व चळवळी, सर्व राजकीय पक्ष हे उच्च मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीयांच्या हातात होत्या, तो श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दुवा होता. 1995 नंतर हा सगळा वर्ग, त्यांची मुलं परदेशात जायला लागले. हे राजकारणापासून दूर गेले, त्या राजकारणाला खूप मोठा वर्ग ज्याची गरज आहे राजकारण तो तुच्छ मानायला लागला. राजकारणाचा स्तर खाली जाऊ लागला, असही राज ठाकरे म्हणाले.

तुमचा राजकारणात सहभाग नसल्यामुळेचं तुमचा आजुबाजूचा परिसर, वातावरण बरबाद होतय
1995 च्या आधी महाराष्ट्रात होत असलेला भ्रष्टाचार आणि 1995 नंतर महाराष्ट्रात होत असलेला भ्रष्टाचार यात जमीन आसमानाचा फरक आहे. मला आयुष्यात काही करता येत नाही तर काय करायचं राजकारणात जायच. राजकारण नुसत सुशिक्षित असून चालत नाही तर सुज्ञ असावं लागतं. तुमचं अख्ख आयुष्य सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत राजकारणाला बांधिल आहे. सकाळी उठलात की दुधं लागत, दुधाचे भाव राजकारणी ठरवतात. पाणी लागतं पाणी पट्टी नगरसेवक आणि प्रशासन ते ठरवतात. तुमच्याकडे येणारी वीज त्याचे भाव आमदार प्रशासनाकडून ठरवले जातात. ते दर तुम्ही निमूटपणे भरतात. शाळेचा अभ्यासक्रम सरकार म्हणजे प्रशासन निवडणून आलेले प्रतिनिधी ठरवतात. तुम्ही निमुटपणे सहन करता तुम्ही जाब विचारत नाही. या परिस्थितीत अनेक तरुण- तरुणी कंटाळतात व ते परदेशात जातात. तुमचे गप्प राहणे, तुमचा सहभाग राजकारणात नसणे यामुळे आजुबाजूचा परिसर, वातावरण बरबाद होत आहे, असाही राज ठाकरे यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button