breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने फळपीक विम्याची मुदत वाढवली

Fal Pik Vima Yojana 2024 | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा भरून शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. या हंगामात राज्यात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष क इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे.

हेही वाचा     –      ‘मृतांनाच आरोपी ठरवण्याचा प्रयत्न’; कल्याणीनगर अपघात प्रकरणी अनिल देशमुखांचा आरोप 

भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलियांज, फ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार कंपन्यांच्या मार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. मृग बहरात द्राक्ष, काजू, संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत २५ जून आहे. त्याचबरोबर मोसंबी चिकू ३० जून, डाळिंब १४ जुलै तर सीताफळ पिकासाठी ३१ जुलै ही मुदत देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button