breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

तब्बल १८ तासानंतर पुण्यातलं एमपीएससीच आंदोलन स्थगित

राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा

पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौक येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तब्बल १८ तासानंतर पुण्यातलं एमपीएससीच आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी ठिय्या थांबवला. आज पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी सातत्याने विद्यार्थ्यांच्या वतीने याआधी आंदोलने करण्यात आली. पण सरकारने फक्त आश्वासन दिली. नागपूर येथील अधिवेशनात देखील आंदोलन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं आणि वेगळ्याच शिष्टमंडळाला बोलवण्यात आल. आत्ता जो पर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत अश्याच पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं.
पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. अनेक वर्ष विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र, 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. अभ्यासक्रमातील बदलास विरोध करत नव्या अभ्यासक्रमाबाबतच नियम किंवा नवा पॅटर्न 2025 मध्ये लागू करावा. या नव्या पॅटर्नबाबत जर सरकारने निर्णय घेतला नाही आम्ही आंदोलन असच सुरू ठेवू अस म्हणत मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button